ग्रामपंचायत चास
चास गाव हा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हातील मोखाडा तालुक्यामध्ये आहे व इथे चास गावदेवी मंदिर हे गावातील श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे महत्त्वाचे केंद्र आहे. सन-२०११ च्या जनगणने नुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २६०९ आहे.जिल्हा परिषद शाळा- ६ अंगणवाडी-१० व व्यायामशाळा-१ अशी सुविधा उपलब्ध आहेत .गावातील ग्रामस्थ गावदेवीला आपल्या गावाची रक्षणकर्ती व कुलस्वामिनी शक्ती मानून श्रद्धेने पूजा-अर्चा करतात.गावातील विविध धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव आणि पारंपरिक विधींमध्ये गावदेवीचे विशेष महत्त्व आहे. गावाच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि गावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी ग्रामस्थ देवीची मनोभावे प्रार्थना करतात.गावदेवी मंदिरामुळे गावातील परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा जपण्यास मदत होते. नवीन पिढीला आपल्या गावच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देण्याचे कार्यही या मंदिराच्या माध्यमातून घडते.
चास हे निसर्गरम्य वातावरणाने नटलेले सुंदर गाव आहे. हिरवाईने वेढलेले हे गाव पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात वसलेले आहे. गावातील नागरिकांचे जीवन प्रामुख्याने शेती, मजुरी व पारंपरिक व्यवसायांवर आधारित आहे.गावात विविध समाजातील नागरिक एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतात. गावात पारंपरिक सण, उत्सव, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. निसर्गसौंदर्य, साधेपणा आणि आपुलकीची भावना ही चास गावाची प्रमुख ओळख आहे.“एकता, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे आपले चास गाव.”
चास गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात गावदेवी मंदिराचे स्थान विशेष असून, ग्रामस्थांची श्रद्धा आणि एकजूट हीच या मंदिराची खरी ओळख आहे.

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री

श्रीम. सुनेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री. राजेंद्र पाटील
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

मा. श्री. अक्षय संजय पगार
गट विकास अधिकारी
पंचायत समिती मोखाडा
सौ.प्रियंका संदिप गोविंद
सरपंच
ग्रामपंचायत चास
श्री.रविंद्र गंगा गोविंद
उपसरपंच
ग्रामपंचायत चास
श्री. प्रविण शानू कामडी
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत चास
चालू योजना







